फडणवीस सरकारची कसोटी, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

  • Share this:

 vidhan bhavan3

04 मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरवात होणार आहे.  या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. पण मुंबई महापालिकेचा तिढा सुटल्याने शिवसेना चहापानला हजेरी लावेल हे नक्की झालं आहे.

सध्या मुंबई कुणाची हा तिढा जरी मुख्यमंत्र्यांनी सोडवला असला तरीही अधिवेशनात शिवसेना आमदार काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे. शिवसेनेने या अगोदरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. या अर्थसंकल्पात कर्जमाफी बाबतची भूमिका सरकारने घेतली नाही, तर अर्थसंकल्पानंतरचे अत्यंत महत्त्वाचे विनियोजन विधेयक रोखून शिवसेना सरकारला मोठे आव्हान देईल, अशी शक्‍यता आहे.

त्यासोबतच, जवानाची आत्महत्या, शेतकऱ्याच्या कृषीमालाला भाव नाही, राज्यात खंडणीसाठी झालेले खून, शेतकरी आत्महत्या, या मुद्यावर विरोधक आक्रमक असणार असून भाजप सरकारची कसोटी लागणार आहे.

या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी सर्व विरोधीपक्ष नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत या मुद्यावर चर्चा होईल. पण मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकतील अशी शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत भाजप महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढणार नसल्याचं काल पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यावर, भाजपनं घेतलेली भूमिका जनतेचा विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2017 12:38 PM IST

ताज्या बातम्या