S M L

डाॅ. कृष्णा किरवले हत्याप्रकरणी प्रीतम पाटील अटकेत

Sonali Deshpande | Updated On: Mar 4, 2017 06:11 PM IST

dr krushna kirvale

04 मार्च : डाॅ.कृष्णा किरवले हत्याप्रकरणातील आरोपी प्रीतम पाटीलला जेरबंद करण्यात आलंय.पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून आरोपीची आई मंगला पाटीललाही अटक केलीय.

अांबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत डाॅ. कृष्णा किरवले यांचा काल दुपारी त्यांच्या राहत्या घरी खून झाला. डाॅ. किरवले यांच्या खुनामुळे अांबेडकरी चळवळीवर मोठा अाघात झाला. कालपासूनच राज्यभरातून त्यांचा मित्र परिवार कोल्हापूरमध्ये दाखल झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ पसरली होती. त्यांचं पार्थिव अाज कोल्हापूरमधील सीपीअारमध्ये ठेवण्यात अालं होतं.

अारोपींवर कारवाई झाल्याशिवाय पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी अारोपी प्रीतम पाटील अाणि त्याची अाई मंगला हिला ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली.त्यानंतर शहरातून अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात अाले. दरम्यान या खून प्रकरणात सर्व शक्यता तपासण्यात येत अाहेत. सध्या तपास क्राईम ब्रॅंचकडे अाहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2017 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close