मुंबईत महापौर निवडणूक भाजप लढणार नाही - मुख्यमंत्री

मुंबईत महापौर निवडणूक भाजप लढणार नाही - मुख्यमंत्री

  • Share this:

CM FOR WAB04 मार्च : महापौर आणि उपमहापौर निवडणूक भाजप लढणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. जोडतोड करून भाजपला महापौरपद मिळवायचं नाही,असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजप स्थायी समितीची निवडणूकही लढणार नाही. भाजपच्या कोअर कमिटीत हा निर्णय घेण्यात आला.

भाजपचे नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतायत, त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद घेणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुंबईसाठी चांगले प्रश्न असतील त्याबाबतीत आम्ही सेनेला समर्थन देऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण पारदर्शकतेशी तडजोड करणार नाही, हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं.

पालिकेच्या कारभारात पारदर्शकता कशी आणायची यावर एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तीन महिन्यात ही समिती अहवाल देईल.

जनतेनं भाजपवर मोठा विश्वास दाखवला, भाजपचा यशाचा ग्राफ वाढतोय, मोदींच्या पारदर्शकतेच्या अजेंड्याला मुंबईत पसंती मिळालीय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईकरांनी दोन्ही पक्षांना कौल दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं.  राज्यातलं सरकार स्थिर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही दिली, सरकारमध्ये शिवसेना आहे आणि दोन्ही पक्ष गुण्यागोविंदानं राहतायत,असंही ते म्हणाले.

भाजपच्या पाठिंब्याचं शिवसेनेकडून जोरदार स्वागत झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2017 05:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading