S M L

नो सेल्फी प्लीज, शिवाजी पार्कच्या सेल्फी पाॅईंटला पालिकेचा नकार

Sonali Deshpande | Updated On: Mar 4, 2017 04:56 PM IST

नो सेल्फी प्लीज, शिवाजी पार्कच्या सेल्फी पाॅईंटला पालिकेचा नकार

04 मार्च : शिवाजी पार्कात कुठलाही आणि कुणाचाही सेल्फी पाॅईंट उभारला जाणार नाही, असं मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी संदीप देशपांडे यांना पत्र लिहून कळवलंय. यापुढे कुठल्याही राजकीय पक्ष, संस्था किंवा व्यक्तीला शिवाजी पार्कात सेल्फी पाॅईंट उभारता येणार नाही.

सेल्फी पाॅइंटवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू होती. मागील आठवड्यात गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेचा बालेकिल्ला ठरलेल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील सेल्फी पॉईंट आता बंद करण्यात आला होता. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवाजी पार्क येथील वॉर्ड क्रमांक १९४ मधून मनसेचा पराभव झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर भाजप, शिवसेना आणि मनसेही या 'सेल्फीश' राजकारणात उतरली होती. पण पालिकेकडूनच आता या सेल्फी पाॅईंटची परवानगी रद्द करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2017 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close