S M L

महापौरपदासाठी कोण आहे रिंगणात?

Sonali Deshpande | Updated On: Mar 4, 2017 03:33 PM IST

महापौरपदासाठी कोण आहे रिंगणात?

04 मार्च : सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय, 8 मार्चकडे. 8 मार्चला मुंबईचा महापौर कोण ते ठरेल. रिंगणात तर सगळेच जण उतरलेत.

पाहुयात मुंबईत सध्या कोणकोणते पक्ष महापौरपदासाठी रिंगणात आहेत ते-

शिवसेना - सर्वात जास्त संख्याबळ सेनेकडे आहेत, सेनेची ताकद सध्या ८८ नगरसेवक एवढी आहे.त्यांचा महापौरपदाचा उमेदवारही ठरलाय.

भाजप - भाजपचा उमेदवार ठरला नसला, तरी त्यांचं संख्याबळ आहे ८४. म्हणजेच संख्याबळ सेनेपेक्षा फक्त चारनं कमी.

काँग्रेस - काँग्रेसनं फक्त ३१ जागा असूनही आपला उमेदवार उतरवलाय तर राष्ट्रवादीनं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय.त्यामुळे एका अर्थानं काँग्रेसचं संख्याबळ आता ४० झालंय.पण मॅजिक फिगर आहे ११४. असं बोललं जातंय की सेनेला अप्रत्यक्षपणे मदत करायला काँग्रेसनं ही खेळी खेळलीय. जेणेकरून जादुई आकडा ११४वरून १००वर यावा.

मनसे - हे फारच आश्चर्यकारक आहे. कारण मनसेकडे आहेत फक्त ७ जागा. तरीही राज ठाकरेंच्या पक्षानं फॉर्म नेलाय. आता हा फॉर्म कोण भरतं, ते पाहायचं.

समाजवादी पक्ष - अतिशय कमी उमेदवार असून महापौरपदाची निवडणूक लढवण्याचं ठरवलंय.आता यामागे काय काळंबेरं आहे, की कोणती सेटिंग आहे, हे कळायला मार्ग नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2017 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close