मुंबईच्या महापौरपदी सेनेच्या विश्वनाथ महाडेश्वरांचं नाव निश्चित

मुंबईच्या महापौरपदी सेनेच्या विश्वनाथ महाडेश्वरांचं नाव निश्चित

  • Share this:

Vishwanath Mahadeshwar WEB

04 मार्च : मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेनं आपला उमेदवार निश्चित केला आहे. विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसेनेकडून महापौर पदासाठी अर्ज भरणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या नेत्यांच्या बैठकीत महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी फाॅर्म भरलाय.

विश्वनाथ म्हाडेश्वर आता तिसरी टर्म म्हणून महापालिकेत निवडून आले आहेत. पहिल्या टर्ममध्ये ते शिक्षण समितीचे चेअरमन होते, नंतर पाच वर्ष स्थायी समितीत होते. २०१२मध्ये पत्नी पूजा महाडेश्वर निवडून आल्या होत्या.

ते राजे संभाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे प्रिन्सिपल होते . वॉर्ड क्रमांक ८७मधून भाजपचे महेश पारकर आणि काँग्रेसचे धर्मेश व्यास यांचा पराभव करून पुन्हा एकदा ते महापालिकेत शिवसेनेचा आवाज बनलेत.

पश्चिम उपनगरातून सक्षम पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 4, 2017, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading