पेंग्विन प्रकल्प सुरू न करण्यास भाजपचं जबाबदार,सेनेचा आरोप

  • Share this:

 Penguine Banner1

03 मार्च : पेंग्विन प्रकल्प सुरू न करण्यासाठी भाजपचं जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी करुन नव्या वादाला तोंड फोडलंय.

दोन्ही पक्षात रोजचं नवनवे वाद निर्माण होतात त्यात आज पेग्विंनच्या मुद्यावरुन वाद सुरू झालाय. पेग्विंनचा महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या कार्यकाळात पूर्ण व्हावा, अशी इच्छा असलेल्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हा आरोप केलाय.

आज स्थायी समिती सदस्यांची पाहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी 6 मार्चपर्यंत आपल्याला हा प्रकल्प सुरू करायचा होता. पण प्रशासन मात्र जाणिवपुर्वक वेळ काढूपणा करत असल्याचं त्यांचं म्हणणंय. या दौऱ्याच्यावेळी फक्त शिवसेनेचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता प्रविण छेडा उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 09:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...