03 मार्च : मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या शर्यतीत शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. या शर्यतीत आता मनसेही उडी घेण्याची शक्यता आहे. मनसेकडून महापौरपदाचा उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी उद्या 4 मार्च रोजी अर्ज सादर केले जाणार आहे. 8 मार्चला महापौरपदाची निवड होणार आहे. पक्षीय बलाबलानुसार शिवसेनेची संख्या आता 88 वर तर भाजपची संख्या 83 वर आहे. शिवसेनेनं महापौर आपलाच होईल असा दावा ठोकलाय. आता मनसेनंही आपल्या सात उमेदवारांच्या बळावर महापौरपदाच्या शर्यतीत उडी घेण्याची तयारी केलीये. मनसेनं महापौरपदाच्या उमेदवारीचा अर्ज देखिल घेतला आहे. पण, महापौरपदासाठी कोण उमेदवार देणार? याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv