पेपरफुटीनंतर सैन्यभरतीची परीक्षा 1 एप्रिलला, गुजरात पॅटर्न वापरणार

पेपरफुटीनंतर सैन्यभरतीची परीक्षा 1 एप्रिलला, गुजरात पॅटर्न वापरणार

  • Share this:

army_exam03 मार्च : पेपरफुटीनंतर रद्द झालेली सैन्यभरती परीक्षा एक एप्रिल रोजी गुजरात राज्याच्या धर्तीवर पार पडणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली आहे.

सैन्यभरती पेपर फुटी प्रकरणाचे सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले असून कोणी कितीही मोठा असला तरी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणार असून  दोषींवर कारवाई होणारच असल्याचे स्पष्ट संकेत सुभाष भामरे यांनी दिले आहेत.

दरम्यान रद्द करण्यात आलेली परीक्षा नव्याने 1 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. परीक्षा पद्धतीत बदल करत गुजरात मॉडेलच्या धर्तीवर ही परीक्षा प्रक्रिया राबविण्याचा संरक्षण मंत्रालय विचार करत असल्याचं सुभाष भामरे यांनी यावेळी सांगितलंय.

सैन्य भरती मंडळातर्फे २६ फेब्रुवारीला लिपिक आणि ट्रेड्समनसह इतर पदांसाठी देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली. त्याचा पेपर फुटल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पुणे, नागपूर आणि गोव्यात छापा टाकून आरोपींना अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 08:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading