मागेल त्याला 'सेल्फी पॉईंट', तिन्ही पक्षांना परवानगी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2017 08:04 PM IST

मागेल त्याला 'सेल्फी पॉईंट', तिन्ही पक्षांना परवानगी

slfie point03 मार्च : शिवाजी पार्कच्या सेल्फी पॉईंटवरुन भडकलेल्या मुद्यावर मुंबई पालिकेनं भलताच उतारा देण्याचा प्रयत्न केलाय. सेल्फी पॉईंटसाठी ज्या ज्या पक्षाचा अर्ज येईल तेवढ्या सेल्फी पॉईंटला परवानगी देण्याचा प्रयत्न पालिकेचा असणार आहे.

आतापर्यंत मनसे, भाजप आणि सेनेचे अर्ज आलेत, त्यांना परवानगी दिल्याची माहिती जी उत्तर वार्डचे उपायुक्त रामाकांत बिरादर यांनी दिली. त्याप्रमाणे तिनही पक्षांना मिळाली वेगवेगळी जागा मिळाली आहे.

मनसेला मिळाली आधीचीच जागा मिळाली तर साऊथ पवेलीयन इथं शिवसेनेला जागा मिळाली. आणि भाजपची जागा अद्याप निश्चिती नाही महत्वाच म्हणजे 50, 50 फूटावर सेल्फी उभारता येईल असंही ते म्हणाले.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने या वादात उडी घेत सेल्फी पॉईंट पेक्षा स्टडी पॉईंट उभारणार असल्याचं म्हटलंय. आमदार निधीतून स्टडी पॉईंट उभारणार असं मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं.

शिवाजी पार्क मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर सेल्फी पॉईंट बंद करणार असल्याची घोषणा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती. त्यानंतर हा वाद भडकला होता.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...