'तू तुझ्या देशात परत जा',अमेरिकेत भारतीय महिलेला धमकी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2017 07:11 PM IST

'तू तुझ्या देशात परत जा',अमेरिकेत भारतीय महिलेला धमकी

03 मार्च : अमेरिकेत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या व्यक्तीला वर्णभेदाला सामोरं जावं लागलंय. न्यूयॉर्कमध्ये एकता देसाई या भारतीय वंशाच्या महिलेवर एका अमेरिकन नागरिकानं मेट्रोमध्ये आरडाओरडा करायला सुरुवात केली. 'तू तुझ्या देशात परत जा', असं तो शिव्या देत ओरडत होता. मेट्रोमध्ये इतके लोक असूनही कुणीही एकताच्या बाजूनं बोललं नाही. हा माणूस स्टेशनवर उतरल्यावर पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली. त्याला ताब्यात न घेता पोलिसांनी त्याला सगळ्यांच्या समोर सोडून दिलं.usa_anita_Desai

एकता देसाईवर झालेली वर्णभेदी शेरेबाजी हे काही एकमेव उदाहरण नाही. गेल्याच आठवड्यात गेल्याच आठवड्यात श्रीनिवास कुचिबोटला या भारतीय तरुणाची कन्सासमध्ये हत्या झाली होती. श्रीनिवासच्या हत्येमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. श्रीनिवास कुचिबोटला हा मूळचा हैदराबादचा रहिवासी होता. श्रीनिवास आणि त्याचा मित्र आलोक जर्मिन या कंपनीत काम करायचे. कन्न्सासमधल्या ओलाथमध्ये तो स्टिन्स बार अँड ग्रिलमध्ये बसला होता. त्यावेळी अॅडम प्युरिंटन नावाचा इसम तिथे आला आणि त्याने 'गेट आऊट ऑफ माय कंट्री' अशी धमकी त्यांना दिली. या अॅडमला पाच तासांनी अटक करण्यात आली.

अमेरिकेत सध्या वर्णभेदामुळे अशांत वातावरण आहे. याबदद्ल डॉनल्ड ट्रम्प यांच्या विखारी प्रचारालाच जबाबदार धरलं जातंय. अमेरिकेत परदेशी लोकांमुळे तिथल्या नागरिकांना रोजगार मिळत नाही. मी सत्तेवर आलो की तुम्हाला नोकऱ्या देईन, अशा प्रकारचा प्रचार ट्रम्प यांनी केला होता. तेव्हापासून अमेरिकन समाजात भारतीय, पाकिस्तानी, इराणी लोकांविषयीचा द्वेष कमालीचा वाढलाय.  अशा घटना रोखण्यासाठी ट्रम्प यांच्या प्रशासनानेच प्रयत्न करण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...