बराक आणि मिशेल ओबामांना पुस्तकासाठी मिळणार 408 कोटी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2017 05:42 PM IST

बराक आणि मिशेल ओबामांना पुस्तकासाठी मिळणार 408 कोटी

barack obama and michelle obama03 मार्च : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांना पुस्तकं लिहिण्यासाठी तब्बल ६ कोटी डॉलर्स मिळणार आहेत. बराक आणि मिशेल प्रत्येकी एक पुस्तक लिहिणार आहेत.. ती पुस्तकं एकत्र विकली जातील.

पेंग्विन रँडमहाऊस या प्रकाशन कंपनीनं काल ओबामा दाम्पत्याशी करार केला. त्यानुसार, त्यांना ६ कोटी डॉलर्स, अर्थात ४०८ कोटी देण्यात येणार आहेत. 'पेंग्विन'सारखेच ४ इतर मोठे प्रकाशक रेसमध्ये होते. पुस्तकांची नावं, कधी रिलीज होणार, ते अजून सांगण्यात आलेलं नाही. पण जेव्हा ही पुस्तकं येतील, तेव्हा प्रीऑर्डरच्या टप्प्यातच खूप खपतील, यात शंका नाही. कारण सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्राध्यक्षांच्या यादीत ओबामांचा नंबर लागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 05:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...