अखेर श्रीनिवासच्या हत्येचा डॉनल्ड ट्रम्प यांनी केला निषेध

 अखेर श्रीनिवासच्या हत्येचा डॉनल्ड ट्रम्प यांनी केला निषेध

  • Share this:

Trump_GE_28101603 मार्च : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी श्रीनिवास कुचिबोटला या भारतीय तरुणाच्या हत्येचा निषेध केलाय. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात डॉनल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा निषेध करणारं वक्तव्य केलं. अमेरिकेमधल्या कानसासमध्ये झालेल्या भारतीय तरुणाच्या हत्येचा अमेरिका निषेध करते, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.

श्रीनिवास कुचिबोटला याची 22 फेब्रुवारी रोजी कानसासमधल्या एका बारमध्ये हत्या झाली होती.  श्रीनिवासचा एक मित्र आलोक मदसानी हाही या गोळीबारात जखमी झाला. या दोघांसोबत एक अमेरिकन तरुणही होता. ही हत्या वर्णभेदामुळेच झाली, असा आरोप होतोय. याबद्दल डॉनल्ड ट्रम्प यांच्या विखारी प्रचारालाच जबादार धरलं गेलं. त्याचबरोबर एवढी गंभीर घटना घडूनही डॉनल्ड ट्रम्प यांनी त्याचा उल्लेखही केला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. पण आता मात्र, अशा द्वेषप्रवृत्तींचा आणि अपप्रवृत्तींचा आपण सगळ्यांनी मिळून निषेध केला पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले.

श्रीनिवास कुचिबोटला हा हैदराबादचा तरुण आणि त्याची पत्नी अमेरिकेत राहत होते. श्रीनिवास हा ओलाथमध्ये ऑस्टिन्स बार अँड ग्रिलमध्ये बसला होता. त्यावेळी अॅडम प्युरिंटन नावाचा इसम तिथे आला आणि त्याने गेट आऊट ऑफ माय कंट्री अशी धमकी त्यांना दिली. या हल्लेखोराला पाच तासांनी अटक करण्यात आली. श्रीनिवास आणि त्याचा मित्र आलोक जर्मिन या कंपनीत काम करायचे.

श्रीनिवासच्या हत्येनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. श्रीनिवास कुचिबोटला याची पत्नी सुनयना दुमला हिने पत्रकार परिषद घेऊन तिच्या वेदनेला वाट करून दिली होती. माझ्या पतीचं अमेरिकेवर प्रेम होतं. त्याने अमेरिकाविरोधी कोणतंही कृत्य केलेलं नव्हतं तरीही त्याला केवळ द्वेषापोटी मारण्यात आलं, असं तिने म्हटलं होतं. ही हत्या वर्णभेदामुळे झाल्याने जगभरातूनच याचा निषेध केला गेला. याआधी, राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अशा घटनांचा निषेध केला पाहिजे, असं हिलरी क्लिंटन यांनाही म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 3, 2017, 5:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading