नगरसेवक फुटू नये म्हणून भाजपच्या 6 शिलेदारांचा पहारा

  • Share this:

 bjp-pradarshan03 मार्च : मुंबई महापालिका निवडणुकीच्या महापौरपदासाठी सर्वपक्षीयामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपनेही आता फिल्डिंग लावली असून 6 शिलेदारांवर नगरसेवकांची जबाबदारी सोपवली आहे.

महापौरपदाच्या निवडीमध्ये कोणताही गोंधळ अथवा नगरसेवक फूट नये म्हणून भाजपने आता कंबर कसलीये. यासाठी मुंबई भाजपच्या नगरसेवकांची जबादारी 6 लोकांवर निश्चित केलीये.

शैलजा गिरकर, मकरंद नार्वेकर यांच्यासह 6 विभागप्रमुखांवर ही जबाबदारी सोपवण्यात आलीये. प्रत्येक विभागप्रमुखला 10/12 नगरसेवकांची जबाबदारी देण्यात आली आहे.  पक्षाने सांगितल्याशिवाय मुंबई बाहेर कुणालाही जाऊ न देण्याची फिल्डिंग विभागप्रमुखांनी लावलीये. तसंच  महापौरपदाची निवडणूक होईपर्यंत नगरसेवक फुटू न देण्याची जबाबदारी या विभागप्रमुखांवर सोपवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 05:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading