जवानांची व्यथा मांडणाऱ्या जवानाचा संशयास्पद मृत्यू

जवानांची व्यथा मांडणाऱ्या जवानाचा संशयास्पद मृत्यू

  • Share this:

nashik_devali03 मार्च : 'वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलांना शाळेत सोडणे आणि त्यांचे पाळीव श्वान फिरवणे' अशी सहाय्यकाची कामे करावी लागत असल्याचे सांगत जवानांची व्यथा मांडणाऱ्या देवळाली कॅम्पमधील बेपत्ता जवान रॉय मॅथ्यूचा या ३३ वर्षीय जवानाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रॉय हा २५ फेब्रुवारी पासून बेपत्ता होता, अखेर काल देवळाली कॅन्टॉनमेंटमधील एका खोलीत रॉयचा गळफास घेतलेला, कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. रॉय मॅथ्यूचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉय मॅथ्यू गेल्या १३ वर्षांपासून लष्करात कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्पमधील जवानांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जवान वरिष्ठांच्या मुलांना शाळेत सोडणे-आणणे, तसंच त्यांची कुत्री फिरवणे अशी सहाय्यकाची कामे करताना दिसत होते, या स्टिंग ऑपरेशनमुळे मोठा वादही निर्माण झाला. ब्रिटीशांच्या राजवटीतीप्रमाणे जवानांना सहाय्यकाची वागणूक देण्यात येत असल्याची टीकाही लष्करातील अधिकाऱ्यांवर करण्यात आली होती.

याप्रकरणानंतर इतर जवानांसह मॅथ्यूचीही चौकशी करण्यात येत होती. मात्र २५ फेब्रुवारीपासून तो अचानक गायब झाला आणि अनेक दिवस त्याचा काहीच पत्ता लागला नाही. मात्र गुरूवारी संध्याकाळी कॅम्पमधील एका निर्जना भागातील खोलीत त्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्यान एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी पुढील चौकशी करण्यात येत असून रॉय मॅथ्यूचा कोणी छळ केला होता का, चौकशी प्रकरणामुळे तो दबावाखाली होता का हेही तपासण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 04:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading