दानवेंच्या मुलाच्या लग्नात शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये मानापमानाचं नाट्य

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2017 04:37 PM IST

दानवेंच्या मुलाच्या लग्नात शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये मानापमानाचं नाट्य

khaire_and_Save103 मार्च : निवडणुका संपल्यातरी सेना- भाजपमधील वाकयुद्ध संपलेलं नाही. याची झलक पाहायला मिळाली ती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नात.

सेनेचे गटनेते खासदार चंद्रकांत खैरे लग्न सोहळ्यासाठी आले. स्टेजवर चढतांना ते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या रांगेत बोलत बोलत बसले. त्याचवेळी गिरीष बापट आणि पंकजा मुंडे स्टेजवर आले. मात्र त्यांना बसायला जागा नव्हती. त्यावेळी भाजप आमदार अतूल सावे स्टेजवर धावले. त्यांनी खासदार खैरे यांना सेनेच्या नेत्यांना पाठीमागे जागा ठेवल्याचं सांगितलं.

मात्र, खैरे यांनी सावेंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर सावे यांनी खैरे यांना मागे बसण्याची सुचना केली. त्यावर खैरैंनी सावेंना चांगलंच सुनावलं. दोघामध्ये बाचाबाची सुरू असतांना, सेनेचे मंत्री अर्जून खोतकर  आणि केसरकर तिथं आले. त्यामुळे ही बाचाबाची वाढत चालली होती.

khaire_and_Save2अखेर सेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी सेनेच्या नेत्यांना लग्नातून बाहेर पडण्याच्या सुचना केल्या. प्रकरण लक्षात येताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी केली. त्यांनी अतुल सावेला समजावलं, आणि खैरे पहिल्याच रांगेत बसून राहिले. मात्र हा प्रकार सेना नेत्यांच्या जिव्हारी लागला एवढं मात्र नक्की आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...