मुंबईत लवकरच धावणार चालक विरहित ‘मेट्रो’

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2017 12:37 PM IST

Pne metro123

03 मार्च :  मुंबईत लवकरच चालक विरहित मेट्रो धावणार आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 प्रकल्पात कम्युनिकेशन बेस्ड टॅक्नॉलॉजीच्या आधारावर मेट्रो धावणार आहे. मात्र, खबरदारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीला वर्षभर मेट्रोत मोटरमनची हजेरी असेल.

विनामोटरम मेट्रोचा प्रयोग सध्या दिल्लीतील मेट्रो मार्गावर सुरू आहे. तेथेही वर्षभर हा प्रयोग केला जाणार आहे. त्यानंतर वर्षभरातील कारभाराचा आढावा रेल्वे सुरक्षा मंत्रालय घेईल. ट्रेन विनामोटरमन चालवूनही सुरक्षेचा कोणताही प्रश्न न उद्भवल्याचे आढळून आल्यास, त्यानंतर मग खऱ्याअर्थाने मेट्रो मोटरमनशिवाय चालवण्यास परवानगी दिली जाईल. याच धर्तीवर मुंबईतील मेट्रो ३वर हा प्रयोग होणार आहे.

यामध्ये अद्ययावत सिग्नल प्रणाली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो चालवण्यासाठी चालकाची गरज लागत नाही. या तंत्रज्ञानामुळं मेट्रोतील दोन फेऱ्यांमध्ये 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ राखणं शक्य होणार आहे. याशिवाय मेट्रो-3 चा प्रकल्प संपूर्ण भुयारी असून शहरातला हा अशाप्रकारचा पहिलाचा प्रकल्प असणार आहे.

8 डब्याच्या 31 गाड्या कुलाबा ते सिप्झ मार्गावर धावतील. पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभा राहणार असून यामध्ये 5 कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...