'अभासे'च्या गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

'अभासे'च्या गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

  • Share this:

GEETA GAVLI BAN

03 मार्च : मुंबईतील महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि कुख्यात डॉन अरुण गवळीची मुलगी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ आता 83 झालं आहे.

गेली 10 वर्षं गीता गवळींनी शिवसेनेला साथ दिली होती. यावेळी मात्र त्यांनी भाजपला पाठिंबाचा निर्णय घेतला आहे. गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर गीता गवळींनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

गीता गवळी या शिवसेनेला समर्थन देणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. यासाठी त्यांनी काल शिवसेना भवनातही हजेरी लावली होती. मात्र, शिवसेनेबरोबरची बोलणी फिस्कटली. त्यामुळे गीता गवळी निर्णय न घेताच सेनाभवनातून परतल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गीता गवळी यांना चर्चेसाठी काल ‘वर्षा’ बंगल्यावर बोलवलं होतं. गीता गवळी यांना प्रथम वर्षी आरोग्य समिती अध्यक्षपद आणि पाच वर्ष स्थायी समिती सदस्य पद हवं आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा सकारात्मक ठरल्याने गीता गवळी आता महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा देणार आहेत.

Loading...

दरम्यान, भाजपचे सर्व नवनिर्वाचीत नगरसेवकांची आज कोकण भवनात एकत्र जाऊन आयुक्तांकडे अधिकृत  नोदंणी करणार आहे. त्यांच्यासोबत जाऊन गीता गवळीही गटनोंदणी करणार असल्याचं कळतं. त्यामुळे गीता गवळी यांना आपल्या बाजूने वळवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 09:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...