News18 Lokmat

केरळमध्ये संघाच्या मुख्यालयाजवळ बॉम्बस्फोट

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2017 12:12 AM IST

केरळमध्ये संघाच्या मुख्यालयाजवळ बॉम्बस्फोट

rss_keral403 मार्च : केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या मुख्यालयाजवळ बॉम्बस्फोट झालाय. या बॉम्बस्फोटात चार जण जखमी झाले. उत्तर केरळमध्ये कोझीकोडेजवळच्या नादपुरममधली ही घटना आहे.  दोन मोटरसायकलस्वारांनी हे बॉम्ब फेकले, अशी माहिती मिळतेय. या घटनेनंतर नादपुरममधल्या संघाच्या कार्यालयाचा परिसर पोलिसांनी ताब्यात घेतलाय.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करून असे हल्ले झाले होते. याआधी 31 जानेवारीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. केरळमध्ये कन्नूरमध्ये ही घटना घडली होती. यामध्ये जखमी झालेल्या एका कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करावं लागलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केरळमधल्या सभांमध्ये अशा हल्ल्यांचा निषेध केला होता. या विषयावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवून आणावी, असं त्यांनी म्हटलं होतं. संघाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून एका विशिष्ट विचारसरणीचे लोक हे हल्ले करतायत, असं त्यांनी म्हटलं होतं. पंतप्रधान मोदींचा रोख कम्युनिस्ट पक्षावरच होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 12:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...