News18 Lokmat

ठाणे जेलमध्ये कैद्याचा कॉन्स्टेबलवर हल्ला, वाटी कापून तयार केलं शस्त्र

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2017 09:59 PM IST

ठाणे जेलमध्ये कैद्याचा कॉन्स्टेबलवर हल्ला, वाटी कापून तयार केलं शस्त्र

02 मार्च : ठाण्यातील सेंट्रल जेलमध्ये एका कैद्याने कॉन्स्टेबल आणि अधिकाऱ्यांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघड झालीये. या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये.

ठाणे जेलमधील कॉन्स्टेबल सुभाष राबडे यांच्या कानाचा खालील भागावर आणि डोक्यावर वार करण्यात आलाय. तर अधिकारी पिशे यांच्यावर देखील हल्ला करण्यात आलंय. मोकाअंतर्गत शिक्षा भोगत असलेला कैदी आरमान शेखने हा हल्ला केला. त्याने जेलमध्ये जेवणाच्या ताटातील वाटी कापून धारदार शस्त्र बनवलं आणि त्याने दोघांवर हल्ला केल्याचं समजतंय.

योग्य ती सेवा न दिल्यामुळे आणि तारखेला बाहेर काढत नसल्यामुळे त्याने हा हल्ला केल्याचं कळतंय.

ठाण्यातील या मध्यवर्ती कार्यालयात यापूर्वी देखील कैद्यांनी पोलिसांवर हल्ले केले आहेत. हा प्रकार मीडियामध्ये आल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 09:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...