जळगाव जिल्हा बँकेत नोटबंदीत 73 लाखांची हेराफेरी, सीईओवर गुन्हा दाखल

  जळगाव जिल्हा बँकेत नोटबंदीत 73 लाखांची हेराफेरी, सीईओवर गुन्हा दाखल

  • Share this:

jalgaon_bank02 मार्च : जळगाव जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेवर सीबीआयने छापा टाकला. या छाप्यात  नोटाबंदीच्या काळात 73 लाखांच्या नोटा बदलून देण्याचा प्रकार घडल्याचं समोर आलंय. या प्रकरणी बँकेच्या सीईओंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नोटाबंदीच्या काळात नोटांची हेराफेरी केल्या प्रकरणी जळगाव जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेवर छापा टाकण्यात आलाय. नोटाबंदीच्या काळात 73 लाखांच्या नोटा बदलण्यात आल्याचा प्रकार घडल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय चोपडा शाखेचे मॅनेजर आणि कॅशिअरची चौकशी सुरु करण्य़ात आलीये.

जळगाव जिल्हा बँकेवर एकनाथ खडसे य़ांच्या कन्या रोहिणी खडसे खेलवलकर यांच्या गटाची सत्ता आहे. नोटाबंदीच्या काळात भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेत गोलमाल झाल्यानं जळगावमध्ये हा विषय चर्चेचा झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 2, 2017, 9:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading