News18 Lokmat

नगरमध्ये पुन्हा बनावट दारूचा बळी, एकाची प्रकृती चिंताजनक

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2017 08:28 PM IST

nagar_news302 मार्च : अहमदनगरमधील पांगरमलचं राजकीय दारुकांड ताजं असताना नेवासा तालुक्यातील तरवडी गावात बनावट दारूचा आणखी एक बळी गेल्याची बाबसमोर आल्यामुळे खळबळ उडालीये.

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातल्या बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश केल्यानंतरही बनावट दारूचे प्रकार सुरूच आहे.  नेवासा तालुक्यातील तरवडीत बिबनभाई सय्यद यांचा बनावट दारू पिल्यामुळे मृत्यू झालाय.

बुधवारी उपचारावेळी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय. तर नसीर इस्माईल सय्यद दारू पिल्यानं अत्यावस्थ आहेत. अत्यावस्थ असल्याने त्याला विखे फाउंडेशनच्या रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 08:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...