भाजप कोअर कमिटीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे, दानवे 'आऊट'

भाजप कोअर कमिटीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे, दानवे 'आऊट'

  • Share this:

danve_bjp02 मार्च : महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप कोअर कमिटीचे सर्वाधिकार  आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले आहे. तर मुंबई पालिकेतील निर्णयाचे अधिकार आशिष शेलारांकडे सोपवले.

भाजप कोअर कमिटीचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेत. मुंबई पालिकेत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आता मुख्यमंत्री आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे सोपवले असून राज्याचे सर्व जिल्हा परिषदांसदर्भांतले अधिकारही मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. मात्र हे अधिकार याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोअर कमिटीच्या अध्यक्षाचं महत्त्व पटवून दिलं होतं, त्यावेळेस त्यांचा तोरा बघण्यासारखा होता. भाजपच्या कोअर कमिटीचा मी अध्यक्ष आहे. मी खुर्चीवर बसलेला असतो आणि सगळे बाजूला बसलेले असतात. भाजपचा प्रदेशाध्यक्ष काय असतो हे तुम्हाला भाजप कार्यकर्त्या झाल्यावर कळेल असं दानवे म्हणाले होते. आता दानवे यांनाच कोअर कमिटीतून मुक्त करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 08:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading