मनसेच्या सेल्फी पाईंटवरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

मनसेच्या सेल्फी पाईंटवरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

  • Share this:

mns_selfiy_point02 मार्च : शिवाजी पार्कातल्या सेल्फी पॉईंटवरुन सेना भाजप आणि मनसेत वादावादी सुरू झाली आहे. मनसेचा सेल्फी पॉईंट बंद करण्याचा निर्णय घेत नाही तेच भाजपने सेल्फी पॉईंट पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. भाजपच्या खेळीवर लगेच शिवसेनेनं डाव टाकत आम्हीच सेल्फी पाईंट सुरू करणार अशी घोषणा करून टाकलीये.

राजकीय पक्षांमध्ये वाद कशावरुन होतील किंवा चढाओढ कशात लागेल याचा नेम नाही. दादरच्या शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंटवरुन आता मनसे विरुद्ध भाजप-शिवसेना असा वाद सुरू झालाय. निवडणुकीनंतर सेल्फीपॉईंट बंद करणार असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडेंनी जाहीर केलं होतं. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सेल्फी पॉईंटची जबाबदारी भाजप घेईल असं जाहीर केलं.

त्यावर कडी करीत शिवसेनेनं सेल्फी पॉईंटची जबाबदारी शिवसेनेची असल्याचा बॅनर लावून टाकला. शिवसेना- भाजपात सेल्फी पॉईंटवरुन चढाओढ लागल्याचं पाहून मनसेनं पुन्हा सेल्फी पॉईंट सुरू करणार असल्याचा बॅनर लावलाय. आता या सेल्फी पॉईंटचा वाद कोणत्या वळणावर जातो हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 07:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading