दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी सर्वसामान्यांना वाहतूक बंदी

दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी सर्वसामान्यांना वाहतूक बंदी

  • Share this:

danve_douter_maridge302 मार्च : आदर्श नेमका कुणाचा घ्यायचा? नेत्याचा की अभिनेत्याचा? हे प्रश्न विचारण्याचं कारण आहेत ते अमिताभ बच्चन आणि रावसाहेब दानवेंची कृती.

आज औरंगाबादमध्ये रावसाहेब दानवेंच्या मुलाचं लग्न होतंय. हे लग्न ज्या बीड बायपास रोडवरील मोठ्या लाॅन्सवर लग्नसोहळ्याचा मंडप आणि सजावट साकारलीय. सायंकाळी सात वाजता लग्नाचा मुहुर्त असल्यानं सहा वाजेनंतर बीड पायपास आणि प्रतापनगर उड्डान पुलावरील वाहतूक सामान्यासाठी बंद करण्यात आलीय. बीड बायपासवरून सातारा परिसरात जाण्यासाठी शहानुरमिया दर्ग्याजवळ उड्डल पूलही बंद असणार आहे. त्यामुळे सर्व सामन्यांनी सातारा परिसरात जायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय. याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय

तर दुसरीकडे बाॅलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वत:च्या संपत्तीत मुलीला अर्धा वाटा देऊ केलाय. पुरूषी मानसिकता असलेल्या समाजात हा एक आदर्श आहे. त्यामुळे मुलाच्या लग्नासाठी रस्ता बंद करणाऱ्या नेत्याचा आदर्श घ्यायचा की मुलीसाठीही संपत्तीचा वाटा सोडणाऱ्या नेत्याचा आदर्श घ्यायचा असा प्रश्न निर्माण झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 05:30 PM IST

ताज्या बातम्या