सेनेसोबत चर्चा फिस्कटली, गीता गवळींना आता 'वर्षा'चं निमंत्रण

सेनेसोबत चर्चा फिस्कटली, गीता गवळींना आता 'वर्षा'चं निमंत्रण

  • Share this:

geeta_gavali02 मार्च : अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळींची शिवसेनेसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर आता भाजपकडून त्यांचं स्वागत होत आहे. गीता गवळी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानी वर्षा बंगल्यावर बोलणीसाठी निमंत्रण मिळालं आहे.

आज गीता गवळी यांनी शिवसेना भवनात जाऊन सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मात्र, कुठल्याही निर्णयाशिवाय गीता गवळी सेनाभवनातून परतल्या. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत गीता गवळी यांनी पहिल्या वर्षी आरोग्य समिती अध्यक्षपद आणि पाच वर्ष स्थायी समिती सदस्यपदाची मागणी केलीये.

मात्र, गीता गवळी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेसाठी निरोप दिल्यामुळे सेनेसोबतची बोलणी फिस्कटली. विशेष म्हणजे, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्याकडून संपर्क करण्याचा प्रयत्न झाला पण अजून निर्णय झाला नसल्याचं गीता गवळी यांनीच सांगितलं.

सर्वजण स्वतःच्या ताकदीवर लढलेत, त्यामुळे शिवसेनेच्या पाठींब्याबाबत उद्यापर्यंत निर्णय होईल असं गवळी म्हणाल्या. दरम्यान, गीता गवळी आज रात्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 05:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading