दानवेंच्या मुलाच्या लग्नाला उद्धव ठाकरे जाणार नाही

दानवेंच्या मुलाच्या लग्नाला उद्धव ठाकरे जाणार नाही

  • Share this:

shivsenabjpmaharashtra_b

02 मार्च :   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत. रावसाहेब दानवे यांच्या मुलाचं म्हणजेच आमदार संतोष दानवे यांचा विवाहसोहळा आज औरंगाबादमध्ये पार पडणार आहे.

रावसाहेब दानवेंनी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी (22 फेब्रुवारी) ‘मातोश्री’वर  जाऊन उद्धव ठाकरेंना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. पण या लग्नाला उद्धव ठाकरे उपस्थित न राहता, त्या ऐवजी ते आज कोल्हापुरात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

रावसाहेब दानवेंच्या मुलाचं आजच औरंगाबादमध्ये लग्न आहे. त्यात दोन्ही लग्नांचा मुहूर्त संध्याकाळचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे औरंगाबादला न जाता कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत.

प्रसंग जरी घरगुती असले तरीसुद्धा शिवसेना भाजपसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे कुठलेच संकेत जाणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 01:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading