आलिया, महेश भटना धमकी देणाऱ्याला अटक

आलिया, महेश भटना धमकी देणाऱ्याला अटक

  • Share this:

 

mahesh-bhatt-alia-bhatt

02 मार्च :  प्रसिद्ध चित्रपट निर्माता- दिग्दर्शक महेश भट यांच्याकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांंनी अटक केली आहे.

महेश भट्ट यांना काल फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीने 50 लाख रुपयांची मागणी केली होती. त्याचबरोबर, जर हे पैसे दिले नाही तर मुलगी आलिया भट आणि पत्नी सोनी राजदान यांना जीवे मारण्याची धमकीही या व्यक्तीने भट यांना दिली होती.

सुरुवातीला धमकी देणाऱ्या व्यक्तीनं महेश भट्ट यांना फोन केला होता. पण त्याच्या या धमकीकडे महेश भट्ट यांनी फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण त्यानंतर धमकीचे अनेक मेसेज महेश भट्ट यांना पाठवण्यात आले. त्यानंतर मात्र, महेश भट्ट यांनी पोलिसात धाव घेतली.

याप्रकरणी खार पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री भट्ट यांचा जबाब नोंदवून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आलं. तपासानंतर हा फोन उत्तर प्रदेशातून आल्याची माहिती पोलिसांसमोर आली. त्यानंतर आज उत्तर प्रदेश पोलीसांनी या अज्ञात व्यक्तीला अटक केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात महेश भट यांनी ट्विटही केलं आहे, यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी यात लक्ष घालावं अशी विनंती केली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading