News18 Lokmat

कोथरूड पोलीस ठाण्यात नोटाबदलीचं रॅकेट ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2017 10:09 PM IST

 कोथरूड पोलीस ठाण्यात नोटाबदलीचं रॅकेट ?

kotharud_police_station01 मार्च : पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात नोटाबदलीचं रॅकेट सुरू असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केलीये.

कोथरूड पोलिसांच्या तपास पथकाचे अधिकारी विक्रम राजपूत, शिपाई धोत्रे यांच्यासह आणखी दोन कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीला सुरेश अग्रवाल यांच्या स्कोडा गाडीत बंदी टाकण्यात आलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा असल्याच्या माहितीवरून कारवाई केली होती. ही गाडी आणि त्यातील रक्कम जप्त करून त्याची माहिती आयकर विभागाला कळवली होती.

धक्कादायक म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या कारवाईची कुठलीच माहिती देण्यात आली नव्हती. या कारवाईत दाखवण्यात आलेल्या वीस लाखाच्या रकमेपेक्षा किती तरी अधिक रक्कम पकडण्यात आल्याची चर्चा सुरू झालीये. ज्यांच्या गाडीत ही रक्कम सापडली त्यांच्या जबाबानुसार ही रक्कम दुसऱ्या व्यक्तीची असल्याच सांगितलंय.

मात्र, ही रक्कम बाळगण गुन्हा असतानाही पोलिसानी कुठलाच तपास पुढे केला नाही. जवळपास महिनाभर ही कारवाई माध्यामांच्या रोजनिशीला दिली गेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबत माहिती मिळाल्यावर कोथरूड पोलीस स्टेशनच तपास पथकच बरखास्त करून टाकलंय.

तीन दिवसांपूर्वी दिघी पोलीस ठाण्यात ही अशीच कारवाई करण्यात आली होती. ज्यातली रक्कम ही तब्बल सव्वा कोटी पेक्षा जास्त आहे. मात्र, ही कारवाई सुद्धा पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुणे पोलीस नेमका नोटांच्या विषयात इतका रस का घेताहेत हे स्पष्ट होत नाहीये. गवगवा झालेल्या या प्रकरणात आता पोलीस उपायुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 10:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...