News18 Lokmat

नांदगावकरांची भूमिका शिवसैनिक म्हणून, अनिल देसाईंकडून स्वागत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2017 09:46 PM IST

नांदगावकरांची भूमिका शिवसैनिक म्हणून, अनिल देसाईंकडून स्वागत

desai_nandgaonkar301 मार्च : बाळा नांदगावकर हे एकेकाळी शिवसैनिक होते. त्यामुळे त्यांनी शिवसैनिकांच्या भूमिकेतून आपली भावना मांडली असेल असं म्हणत शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी बाळा नांदगावकरांच्या भूमिकेचं स्वागत केलं.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा या कार्यक्रमात आज अनिल देसाई यांनी खास मुलाखत दिली. युतीसाठी जागावाटपाचा सेनेकडून प्रामाणिक प्रयत्न झाला. पण, त्यांना आमचा प्रस्ताव मान्य नव्हता. अखेर आम्ही स्वबळावर लढलो. मुंबईतील मराठी माणसांनी शिवसेनेला साथ दिली. बहुमत आम्हाला मिळणार अशी शक्यता होती. पण तसं होऊ शकलं नाही. पण, आकडा समाधानकारक आहे. त्यामुळे  शिवसेना आणि भाजपमध्ये निवडणुकीची लुटुपुटीची लढाई नव्हती असं अनिल देसाईंनी स्पष्ट केलं.

तसंच मनसेला आता टाळी देण्याचा विषय संपलाय. जो काही निर्णय होता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. आता बाळा नांदगावकर सेनेच्या महापौराबद्दल जे काही वक्तव्य केलं ते एक शिवसैनिक म्हणून केलंय. नांदगावकर हे एकेकाळचं शिवसैनिक होते असं म्हणत नांदगावकरांच्या वक्तव्याचं स्वागत केलं. मध्यावधी निवडणुकीच्या कल्पना या शरद पवार यांना शोभते असा टोलाही देसाईंनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...