मुंबई महापौर निवडणूक 8 मार्चलाच होणार

  • Share this:

mumbai_palika01 मार्च : मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक 8 मार्चलाच होणार आहे. महापालिका आयुक्त अजॉय मेहतांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन निवडणुकीची तारीख निश्चित केलीये.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचाल सुरू झाली आहे. 9 मार्चला महापालिकेचा कारभार संपत असल्यामुळे महापौरपदाची निवडणूक कधी घेणार यावरून पेच निर्माण झाला होता. 8 मार्च किंवा 9 मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्यावरून शिवसेना आणि भाजपचे नेते आमनेसामने आले होते. मात्र, आज पालिका आयुक्त अजाॅय मेहतांनी 8 तारखेवर शिक्कामोर्तब केलंय.  दुसरीकडे  निवडणूक 8 किंवा 9 मार्चला घ्या महापौर शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार शिवसेनेनं केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 08:36 PM IST

ताज्या बातम्या