01 मार्च : मुंबईत सेना-भाजपच्या आसपासच्या जागांमुळे इथं सुद्धा महापौर कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्षातून किमान तीन-चार नावं चर्चेत आहेत. कोण-कोण आहेत महापौरपदाच्या शर्यतीसाठी ?
यावेळी मुंबईतलं महापौरपद हे खुल्या वर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या जागेसाठी पुरुष नगरसेवकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. असं झाल्याचं सर्वात मोठा शिवसेना पक्षातून मंगेश सातमकर,आशिष चेंबुरकर,रमेश कोरगावकर यांच्या नावाची चर्चा आहे.
तर महिलांना उमेदवारी द्यायची झाल्यास विशाखा राऊत,किशोरी पेडणेकर, शुभदा गुडेकर,राजूल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसऱ्या क्रमांकाच्या भाजपकडून मराठी चेहरा म्हणून, शैलजा गिरकर, अलका केरकर तर गुजराती नावांमध्ये मनोज कोटक, अतुल शहा, राम बारोट यांची नाव चर्चेत आहे.
काँग्रेसने निवडणुकीत मुस्लीम नगरसेवकाला प्राध्यान्य देणार असल्याचं कळतंय. त्यामुळे आसिफ झकेरीया यांचं नाव चर्चेत आहे. शिवाय रवी राजा यांचं नाव पुढे केलं जाण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv