News18 Lokmat

सेना-भाजप युती न झाल्यास मुंबईचा विकास रखडणार?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2017 08:36 PM IST

सेना-भाजप युती न झाल्यास मुंबईचा विकास रखडणार?

sena_bjp_pointer301 मार्च : मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणून म्हणावा तसा विकास सेना का करु शकली नाही? असा प्रश्न जेव्हा ही उपस्थित झाला तेव्हा शिवसेनेनं राज्य सरकारकडे बोट दाखवलं.

राज्य सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं असल्यामुळे आमची अडवणूक झाल्याचं सांगितलं गेलं. पण आता संधी असताना सुद्धा सेना-भाजप आपापल्या अहंभावामुळे मुंबईचा विकास रखडवणार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय. आपापल्या स्थितीप्रमाणे दोन्ही पक्षांनी वेगळे रहाण्याचा निर्णय घेतल्याच काय स्थिती होईल यावर एक नजर टाकूया.

युती न झाल्यास मुंबईचा विकास रखडणार?

१) सेनेचा महापौर झाला तरी स्थायी समिती आणि इतर समित्यांच्या मतदानाच्यावेळी पुन्हा पेच निर्माण होईल.

२) स्थायी समिती अध्यक्ष सेनेनंच बसवला तर भाजपचा विरोधी पक्ष नेता असेल. अशावेळी छोट्या छोट्या प्रस्तावावर संमती मिळणं कठिण, त्यामुळे जुने-नवे सगळे प्रकल्प रखडतील.

Loading...

३) सेनेनं इतरांना सोबत घेवून प्रस्ताव संमत करण्याचं ठरवलं तर, विरोधी पक्ष म्हणून भाजप त्या पक्षाची आणि सेनेची जनतेत कोंडी करेल.

४) ही कोंडी फोडण्यात सेनेला यश आलं तरी पालिकेचे आयुक्त कोण हे मुख्यमंत्री ठरवतात. महापालिकेसंदर्भात सगळे अधिकार आयुक्तांना असल्यामुळे आयुक्त आस्ते कदमचं धोरणं स्वीकारुन सेनेला जेरीस आणू शकतात.

5) अडीच वर्षात पुन्हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला वरचं काही करुन दाखवायचं आहे. त्यासाठी मुंबईत अनेक मोठे आणि महत्वाचे प्रकल्प राज्य सरकारने सुरु केले आहेत मेट्रो, नाव्हा-शीवा, एलीव्हेटेड काॅरीडाॅर वगैरे यासाठी भाजपला सेनेची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...