बेळगाव पालिकेवर मराठी झेंडा,महापौरपदी संज्योत बांदेकर

बेळगाव पालिकेवर मराठी झेंडा,महापौरपदी संज्योत बांदेकर

  • Share this:

belgaum municipal corporation01 मार्च : बेळगावच्या महापौरपदी पुन्हा एकदा मराठी भाषिकांचा झेंडा फडकलाय. आज बेळगावच्या महापौरपदी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणि विकास आघाडीच्या उमेदवार संज्योत बांदेकर यांची निवड झालीय. तर उपमहापौरपदी नागेश मंडोऴकर यांची निवड झालीय.

आज महापौर निवड असल्यामुळे सीमाभागासह संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचं लक्ष या निवडीकडं लागलं होतं. कन्नड नगरसेवकांनी आणि नेत्यांनी मराठी भाषिक महापौर होऊ नये म्हणून जोरदार तयारी केली होती. पण महाराष्ट्र एकाकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी अस्मिता जपत सगळे म्हणजेच 32 नगरसेवक एकत्र आले होते. आणि महापौरपदाच्या निवडणुकीत बांदेकर यांना 57 पैकी सर्व मराठी नगरसेवकांची मतं म्हणजेच 32 मतं पडली आणि त्यांचा विजय झाला. तर कन्नड गटातून उमेदवारी असणाऱ्या पूष्पा पर्वतराव यांना 10 तर उर्दू गटातून जयश्री माळगी यांना 17 मतं पडली.

बेळगावचे जिल्हाधिकारी एन. जयराम यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. त्यामुळं आता पुन्हा एकदा बेळगावच्या मनपावर मराठी भाषिकांची सत्ता विराजमान झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 1, 2017, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading