नागपूर महापौरपदी नंदा जिचकार

नागपूर महापौरपदी नंदा जिचकार

  • Share this:

Nanda131

01 मार्च :  नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या महापौरपदी नंदा जिचकार यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर यांची निवड करण्यात आली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव आणि सत्ताधारी पक्षाच्या नेतेपदी संदीप जोशी यांची निवड झाली आहे.

नागपूरमधून भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले आहेत. सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपद आरक्षित असल्याने कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात नंदा जिचकार यांचं नाव सर्वात आघाडीवर होतं.

दरम्यान, ५ मार्चला महापौर आणि उपमहापौर पदाची शपथविधी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 03:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading