शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच - बाळा नांदगावकर

शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच - बाळा नांदगावकर

  • Share this:

Bala Nandgaonkar

01 मार्च : मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल, माझं कुळ आणि मूळ तेच आहे, अशी सूचक प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली.

ते आज पुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर नाश्त्यासाठी गेले होते. अनेक नेते तिथे जमले होते. यावेळी गप्पांच्या ओघात बाळा नांदगावकर यांना मुंबईत शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी मदत करणार का, असा प्रश्न विचारला गेला. त्यावेळी नांदगावकर यांनी म्हटलं की, शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल, माझं कुळ आणि मूळ तेच आहे. मनसेचा पराभव झाला हे खरं आहे, आम्ही त्यावर विचार केला आणि करतोय, असं नांदगावकर यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, आजच्या गप्पांमध्ये नांदगावकर यांनी भाजपला राज्यभरात चांगलं यश मिळाल्याचीही कबुली दिली. लोकांनी पंचायत समिती ते लोकसभा एकच सरकार असावं म्हणून भाजपला मते दिली हे मान्य करावं लागेल, असं विश्लेषणही त्यांनी केलं.

मात्र, यंदा ईव्हीएम मशिनबाबतही अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही नांदगावकरांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 01:03 PM IST

ताज्या बातम्या