मुंबईत महापौर निवडीच्या तारखेवरून भाजप-शिवसेना आमने सामने

  • Share this:

mumbai_palika

प्रणाली कापसे, 01 मार्च : मुंबईत महापौर कुठल्या पक्षाचा होणार यावरचा संभ्रम अजून सुटला नसताना, आता महापौरांची निवड कोणत्या दिवशी होणार यावरून वाद निर्माण झालाय.

सुरुवातीला ९ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली होती. पण आता मात्र ती बदलून ८ मार्च करण्याची तयारी प्रशासकांनी सुरू केली असल्याची माहिती मिळतेय. तारीख बदलण्याचा घाट कुणी घातला याबाबत माहिती मिळत नसली तरी त्याचा संबंध उत्तर प्रदेशच्या निवडणुकांशी लावला जातोय. उत्तर प्रदेशात ८ तारखेला शेवटच्या टप्पाचे मतदान आहे.

मुंबईत कुणाला सोबत घेऊन कोण महापौर बनवतो,याचा परिणाम तिथल्या मैदानावर होऊ शकतो असा तर्क लावला जातोय. म्हणून ९ तारखेला महापौर निवडण्याऐवजी ८ तारखेचाच कार्यक्रम आखण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2017 12:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...