S M L

विनोदी लेखक तारक मेहतांचं दीर्घ आजारानं निधन

Sonali Deshpande | Updated On: Mar 1, 2017 01:26 PM IST

विनोदी लेखक तारक मेहतांचं दीर्घ आजारानं निधन

01 मार्च  : विनोदी लेखक,स्तंभलेखक,नाटककार तारक मेहता यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.

2008पासून सब टीव्हीनं 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मालिका त्यांच्या काॅलमवरून सुरू केली आणि ती कमालीची लोकप्रिय ठरली. 'दुनिया ने उंठा चष्मा' हा त्यांचा गुजराती काॅलम प्रसिद्ध होता. 1971पासून चित्रलेखामध्ये त्यांनी स्तंभलेखनाला सुरुवात केली.



त्यांनी अनेक नाटकांची भाषांतरं गुजरातीमध्ये केलीयत. त्यांची 80 पुस्तकं प्रसिद्ध झालीयत. उपहासात्मक विनोदी शैलीमुळे वाचकांमध्ये ते लोकप्रिय होते. पद्मश्री पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला.

त्यांच्या निधनानं साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त होतेय. मृत्यूनंतर त्यांनी देहदान केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 11:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close