बळीराजाचे नव्हे, हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणाऱ्यांचं राज्य - उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav and devendra

01 मार्च : शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे सामनामधून आजही सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. हे बळीराजाचं सरकार नाही, 'बळी' घेणाऱ्यांचं सरकार आहे, टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयमधून केली आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच होतायेत, असं सामन्यात अप्रत्यक्षपणे सुचवण्यात आलं आहे.

राज्यातील भाजप सरकार जलसिंचनासह अनेक कामांच्या गमजा नेहमीच मारीत असते. आताही जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्या पक्षाने त्या विषयी स्व-कौतुकाचे ढोल यथेच्छ पिटले, पण मग तरीही मराठवाड्यात दिवसाला दोन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ का आली, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारलाच द्यावं लागेल, असंही ते म्हणालेत.

त्याचबरोबर, मान्सून चांगला होऊनही राज्यातील शेतकऱ्यांची परवड थांबलेली नाही. सरकार बदलले असले तरी बळीराजाचे रुसलेले नशीब बदललेले नाही. तेव्हा सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चुकीच्या सरकारी धोरणांने केलेल्या ‘हत्या’च आहेत, असं कुणी म्हटले तर सत्ताधाऱ्यांकडे त्याचे काय उत्तर आहे? कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा करायचा नाही आणि दुसरीकडे वरुणकृपेने फुललेल्या शेतमळ्यातील पीक कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणायची. हे बळीराजाचे राज्य नव्हे. हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणाऱ्यांचं राज्य म्हणावं लागे!, अशी टीका ही 'सामना'मधून केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...