S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

नीलम गोऱ्हेंना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

Samruddha Bhambure | Updated On: Mar 1, 2017 10:23 AM IST

neelam tai gohre

01 मार्च : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे मेसेज पाठवणाऱ्याला जळगावहून अटक करण्यात आली आहे.  मुंबई क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. दीपककुमार प्यारेलाल गुप्ता असं या व्यक्तीचं नाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणारे एसएमएस येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली होती. याबाबत त्यांनी मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती आणि पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close