मुस्लिमांचा 'हात' काँग्रेसला, एमआयएमला धुडकावलं

मुस्लिमांचा 'हात' काँग्रेसला, एमआयएमला धुडकावलं

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

28 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष काँग्रेसला धक्का देणार अशी अपेक्षा होती खरी. पण काँग्रेसनं मात्र आपले मुस्लीम मतदार पक्षांसोबत ठेवण्यास यश मिळालं. एमआयएमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे का झाली नाही ?, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट

mim_electionमुंबई महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष काय चमत्कार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. एमआयएमनं आपलं मुंबईतलं खातं उघडलं खरं पण या पक्षाला अवघ्या दोनच जागांवर समाधान मानावं लागलं. पक्षाला या निवडणुकीत २.५५ टक्के म्हणजे १ लाख २७ हजार ७४० मतं मिळाली आहेत. एमआयएमनं ५९ उमेदवार निवडणुकीत उतरवले होते.

पक्षाचे नेते काहीही म्हणत असले तरीही पक्षाला आपला प्रभाव या निवडणुकीत फारसा पाडता आला नाही हेच सत्य आहे. असादुद्दीन आणि अकबरुद्दीन ओवेसी यांनी मुंबईत येऊन सभा घेतल्या तरीही मग पक्षाला विशेष यश का मिळालं नाही ? ओवेसी बंधुंनी शहरात सभा घेतल्या खऱ्या. पण त्यानेच आपलं काम भागेल, अशा भ्रमात शहरातले नेते राहिले आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचे पुरेसे प्रयत्न झालेच नाहीत, असं पक्षातले काही कार्यकर्ते ऑफ द रेकॉर्ड सांगतात. तसंच काही जणांच्या मते मुंबईची पुरेशी माहिती नसतानाही पक्षातील हैदराबादच्या काही नेत्यांनी पक्षाची सूत्र हाती ठेवली आणि आपल्या मर्जीप्रमाणे तिकीट वाटप केलं. आणि तिथेचं पक्षाची बाजू डळमळायला सुरुवात झाली.

मुंबईत काँग्रेसच्या निवडून आलेल्या ३१ पैकी ११ नगरसेवक हे मुस्लिम आहेत. याचाच अर्थ मुस्लिम मतदारांनी एमआयएमपेक्षाही काँग्रेसवर अधिक विश्वास ठेवलाय. मतदान आणि मतदार यांना गृहीत धरलं की, त्या पक्षाला त्यांची जागा दाखवायला जनता मागेपुढे पाहात नाही हेच निवडणुकीतून पुन्हा एकदा दिसून आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 28, 2017, 9:25 PM IST

ताज्या बातम्या