विधानसभेतही पंकजांचा पराभव करू, धनंजय मुंडेंचा दावा

  • Share this:

dhanjay_munde_pankaja_munde28 फेब्रुवारी: आगामी विधानसभा निवडणुकीत परळीत आपलाच विजय होईल असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलाय. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या विजयानंतर विधानसभेतही पंकजांचा थेट पराभव करू असा दावा धनंजय यांनी केलाय. सहानुभूतीचं राजकारण आता परळीत चालणार नाही असा इशाराही त्यांनी पंकजा मुंडेंना दिलाय.

जिल्हा परिषदेत विजयानंतर धनंजय मुंडे यांनी आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधीशी बातचीत केली. पंकजा मुंढे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा फार्स करून पुन्हा एकदा सहानूभूती मिळविण्याचा प्रयत्न करतयात. मात्र धक्कादायक पराभवानंतर तरी त्यांनी आता समजून घ्यावं की सहानुभूतीवर कायमस्वरूपी राजकारण करता येत नाही असा हल्लाबोल धनंजय मुंढे यांनी केलाय.

तसंच बाजारसमिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदामध्ये विजयाची हटट्रिक केल्या नंतर आता विधानसभा निवडणुकीतही आपलाच विजय होणार असल्याचा आत्मविश्वास देखील मुंढे यांनी व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 07:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading