'ईव्हीएम'मध्ये गडबड वाटत नाही शेवटी पराभव हा पराभव असतो -राणे

  • Share this:

rane_sot3242128 फेब्रुवारी : महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचं वाटत नाही. पराभव हा पराभव असतो. तो स्विकारला पाहिजे असं मत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी व्यक्त केलंय.

नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणावर करण्यात येतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या पराभूत उमेदवारांनी तर उच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवलीय. तर अकोल्यात आज अंत्ययात्रा काढण्यात आलीये.

नारायण राणे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याची शक्यता नाकारली. कुणी म्हणत सत्ता आणि पैशाच्या सहाय्याने निवडणूक जिंकली. कुणी म्हणत ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केली. पण, पराभव हा पराभव असतो. पराभवानंतर कारणं देणं योग्य नाही असा सल्लावजा टोला राणेंनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 06:22 PM IST

ताज्या बातम्या