3 वर्षांनंतर राणीचा 'हिचकी'मधून कमबॅक

3 वर्षांनंतर राणीचा 'हिचकी'मधून कमबॅक

  • Share this:

rani

28 फेब्रुवारी : 2014च्या 'मर्दानी' सिनेमात राणी मुखर्जी शेवटची दिसली.3 वर्षांच्या या ब्रेकनंतर राणी घरचं बॅनर यशराज फिल्म्समधून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणारेय.'हिचकी' या तिच्या कमबॅक सिनेमात राणी एका आत्मविश्वासू आणि प्रेरणा घेता येईल अशी भूमिका साकारणार आहे.

यश राज फिल्म्स म्हणजेच घरचीच निर्मिती असलेल्या या सिनेमाबद्दल बोलताना ती म्हणाली, 'मी गेले अनेक दिवस एका चॅलेन्जिंग आणि उत्तम कथेच्या शोधात होते आणि हिचकी अगदी तशीच कथा आहे. आपल्या कमकुवतपणावर मात करून एक स्त्री कशी सकारात्मक आयुष्य जगते असं यातून दिसतं.' अर्थात, सिनेमाबद्दल तिनं जास्त काही सांगितलं नाही.

सिद्धार्थ मल्होत्रा या सिनेमाचं दिग्दर्शन करणारेय.राणीचा मर्दानी सगळ्यांनाच आवडला होता. आता 'हिचकी'बद्दल नक्कीच राणीच्या फॅन्सना उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 28, 2017, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading