परीक्षा केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू

परीक्षा केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू

  • Share this:

anirudha28 फेब्रुवारी : परीक्षा केंद्र पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या 1२ वीच्या विध्यार्थाचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झालाय. अनिरुद्ध शंभरकर असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. अंबरनाथ आणि बदलापूर स्टेशनदरम्यान ही घटना घडलीये.

अनिरुद्ध हा सीएचएम कॉलेजमध्ये बारावीत शिकत होता. त्याला हॉलीफेमिली शाळेत परीक्षा केंद्र मिळालं होतं. रविवारी संध्याकाळी अऩिरुद्धने आईवडिलांना परिक्षा केंद्र बघण्यासाठी जात असल्याचं सांगून, तो बाहेर पडला. रात्री 9 पर्यंत घरी न आल्याने, वडिलांनी त्याच्या मोबाईल फोनवर संपर्क केला, मात्र फोन घेतला गेला नाही.

त्यानंतर घरच्यांनी स्थानिक पोलीस, रेल्वे पोलिसांध्ये संपर्क साधला, तेव्हा अंबरनाथ ते बदलापूरच्या रेल्वे मार्गाच्या दरम्यान एक तरुण धावत्या लोकलमधून पडल्याचं समजलं. शेवटी अनिरुध्दच्या कुंटुबाने आणि पोलिसांनी त्या रेल्वे मार्गावर शोध घेतला असतांना अनिरुद्धचा मृतदेह सापडला. अऩिरुद्धच्या अपघाती मृत्यूमुळे करुणा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 05:20 PM IST

ताज्या बातम्या