अभिषेक-ऐश्वर्या करणार 'गुलाब जामुन'

अभिषेक-ऐश्वर्या करणार 'गुलाब जामुन'

  • Share this:

abhi aish

28 फेब्रुवारी : अभिषेक-ऐश्वर्या बच्चन या रिअल लाईफ जोडीला रिल लाईफमध्ये एकत्र येऊन तब्बल 7 वर्ष उलटली आहेत.2010मध्ये रिलीज झालेल्या रावणनंतर या दोघांनी एकही सिनेमा एकत्र केलेला नाहीये.पण त्यांच्या फॅन्ससाठी एक सुखद बातमी आहे.हे दोघं लवकरच 'गुलाब जामुन' नावाच्या सिनेमात एकत्र झळकणार असं समजतंय.

या सिनेमाची निर्मिती अनुराग कश्यपची कंपनी फॅन्टम फिल्म करणार आहे, तर दिग्दर्शक कोणीतरी नवीन असेल.हे सगळं जमून आल्यास अभी-ऐशचा हा आठवा एकत्र सिनेमा ठरेल.

दोघांनी कुछ ना कहो, गुरू,धूम2, सरकार राज या त्यांच्या सिनेमांची चर्चा जास्त झाली.

गुलाब जामुन हा रोमँटिक काॅमेडी आहे. अभिषेक-ऐश्वर्याला स्क्रीप्ट आवडलंय. खरं तर दोघांनाही एका हिट सिनेमाची गरज अाहे. असं म्हणतात, या सिनेमात अमिताभ बच्चन यांनाही महत्त्वाची भूमिका दिली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 28, 2017, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading