मुंबईकरांसाठी खूशखबर, कोस्टल रोडला महिन्याभरात सीआरझेडची परवानगी

मुंबईकरांसाठी खूशखबर, कोस्टल रोडला महिन्याभरात सीआरझेडची परवानगी

  • Share this:

cm_costal_raod_crz28 फेब्रुवारी :  कोस्टल रोडला सीआरझेडची महिन्याभरात परवानगी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल दवे यांचीही भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सीआरझेडमध्ये येणाऱ्या झोपड्यांच्या पुनर्विकासावर चर्चा झाली. यापूर्वी झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी 61 आणि 49 चा फॉर्म्युला होता. पण एकही एसआरए स्कीम होऊ शकली नाही. तसंच नायर समितीच्या अहवालावर त्वरीत निर्णय घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी दवे यांच्याकडे केली. रायगड किल्ल्याच्या विकासाबाबतही केंद्रीय मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली.  येत्या ४ तारखेला बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 04:30 PM IST

ताज्या बातम्या