मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला; मुंबई महापौरबाबत होणार चर्चा

मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला; मुंबई महापौरबाबत होणार चर्चा

  • Share this:

DEVEN-NAREN

28 फेब्रुवारी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेलं आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असून यामध्ये मुंबईच्या महापौरपदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

पर्यावरण विभागाच्या बैठकांच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीमध्ये गेले आहेत. दिल्लीत दाखल झाल्याबरोबरच तातडीने मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला गेले आहेत. सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. तसंच गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापौरपदाबाबत विषयावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपमधील युती तुटल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये कोंडी कायम आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी शिवसेना आग्रही आहे. भाजपही या पदासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी युतीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 03:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading