News18 Lokmat

मुंबई महापौर पदासाठी शिवसेनेकडून गटस्थापना

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 28, 2017 02:30 PM IST

मुंबई महापौर पदासाठी शिवसेनेकडून गटस्थापना

Shivsena1231

28 फेब्रुवारी :  शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनला अधिकृत नोंदणी करण्यासाठी जाणार आहेत. मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र, महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे.

शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून मुंबईचा महापौर आपल्याच पक्षाचा असेल, असा दावा करण्यात येतोय.  शिवसेनेला मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी, अपक्ष नगरसेवकांची महत्वाची भुमिका आहे. महापौर निवडीवेळी दगाफटका टाळणे हे गट स्थापन करण्याचं मुख्य उद्दीष्ट असतं. त्यामुळेच शिवसेना मुंबई महापालिकेत जो गट स्थापन करणार आहे, त्या गटातच या अपक्ष नगरसेवकांचाही समावेश करण्यात येणार आहे. या गटाची कोकण विभागीय आयुक्तांसमोर अधिकृत नोंदणी करावी लागते. त्यामुळे प्रत्यक्ष महापौर निवडीवेळी दगाफटका झाला तर संबंधित नगरसेवकाचं निलंबन होऊ शकतं. त्यासाठी या अपक्ष नगरसेवकांना कडेकोट बंदोबस्तात, शिवसेनेच्याच नगरसेवकांसोबत आज कोकण भवनात आणलं जाणार आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांची निवड होई पर्यंत, या अपक्ष नगरसेवकांभोवती शिवसेनेचं पोलादी सुरक्षा कवच असणार आहे.

यशवंत जाधव यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी

महापालिकेत सत्ता स्थापनेच्यादृष्टीने शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. यशवंत जाधव यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यशवंत जाधव यांच्या निवडीबद्दल सामनामधून अध्कृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. पक्षीय बलाबल पहाता सभागृह नेत्याची जबाबदारी खंबीरपणे पार पाडण्यासाठी यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ते गेले 38 वर्षं शिवसेनेत कार्यरत आहे. त्याशिवाय नगरसेवक आणि समर्थक अपक्षाची फाटाफूट होऊ नये. यासाठी आज कोकण भवनात शिवसेनेच्या नगरसेवकांची नोंदणी करण्यात आली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...