News18 Lokmat

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 28, 2017 11:19 AM IST

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती

SUMMIT MALLICK IMAGE

28 फेब्रुवारी :  राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (सोमवारी) त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं आहे.

सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आज (मंगळवारी) सेवानिवृत्त होत आहेत. ते 31 जानेवारीलाच सेवानिवृत्त झाले होते. मात्र राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना एक महिन्याची मुदतवाढ मिळाली होती.

सुमित मलिक हे 1982 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते सामान्य प्रशासन विभागाचे (राज शिष्टचार) अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. ज्येष्ठतेच्या निकषावर त्यांना  मुख्यमंत्र्यांनी ही नवी संधी मिळाल्याचं म्हटलं जातंय. मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ सुमारे 2 वर्षांचा असेल.

शांत आणि संयमी स्वभावाचे, तसंच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक आहे. व्यक्ती म्हणून प्रशासनावर छाप सोडण्याऐवजी शासकीय कामकाज अधिक परिणामकारक आणि सुरळीत होण्याच्या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 11:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...